Marathi

Best Meditation Method in Marathi-मराठी

“मानवतेमध्ये सतोगुणाचा उद्धार आणि तमोगुणाचे पतन करण्यासाठी विश्वामध्ये एकटाच निघालेलो आहे. माझ्यावरती कोणत्याही विशिष्ट जाती,विशिष्ट धर्म, तसेच विशिष्ट देशाचा एकाधिकार नाही आहे.”समर्थ सदगुरुदेव श्री रामलालजी सियाग

गुरु सियाग सिद्ध योग

गुरु सियाग सिद्ध योग ही अत्यंत सहज, सोपी परंतु अत्यंत प्रभावी, निशुल्क असणारी एक वेगळी ध्यानाची पद्धत आहे. जी सर्व प्रकारचे शारीरिक तसेच असाध्य रोग जसे एड्स, कॅन्सर इत्यादी तसेच सर्व प्रकारचे मानसिक रोग, सर्व प्रकारच्या व्यसनांपासून व्यक्तीला अल्पावधीत मुक्त करू शकते . तसेच अमर्यादित भौतिक सुख-समृद्धी,अध्यात्मिक उन्नती आणि लाभ देते. व्यक्तीमध्ये संपूर्ण रूपांतरण व आंतरिक विकासाला शक्य बनविते. 

      जर आपण याच्या आधी या साधनेबद्दल कधी ऐकलं नसेल वा आधी कधी ही साधना केली नसेल तर, तुम्ही एकदा अवश्य ही साधना करून पहा.

     तुम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला काहीही सोडण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही फक्त तुमच्या घरीच पंधरा मिनिटाच्या ध्यानाने सर्वकाही सहजपणे प्राप्त करू शकता. तुम्ही हे ध्यान केल्यानंतर व त्याचे अनुभव व लाभ तुम्हाला झाल्यानंतर कृपया, या विषयी इतरांनाही सांगा!

गुरु सियाग सिद्ध योग साधनेस सुरुवात कशी करायची ?

गुरु सियाग सिद्धयोग साधनेमध्ये दोन गोष्टींचा समावेश होतो.

१) मंत्र जप

२) ध्यान

१) मंत्र जप:

  या साधनेमध्ये गुरुदेवांद्वारे दिला जाणारा मंत्र हा संजीवनी मंत्र आहे. हा मंत्र गुरु सियाग यांच्या आवाजातच (व्हिडिओ / ऑडिओमध्ये) ऐकायचा आहे. समर्थ सद्गुरू देव श्री रामलालजी सियाग यांच्या आवाजात संजीवनी मंत्र ऐकणे ही, या साधनेतील “मंत्रदीक्षा”आहे.

    या मंत्राचा मानसिक जप जीभ वा होठ न हलविता करायचा आहे. हा मंत्र दुसरा कोणाला सांगायचा असल्यास फक्त आणि फक्त गुरुदेवांच्या आवाजातच ऐकवायचा आहे. या मंत्राचा  ध्यानाच्या वेळी तसेच दिवसभर जास्तीत जास्त मानसिक जप करायचा आहे. गुरुदेव सांगतात की, निरंतर मंत्रजप ही या साधनेची गुरुकिल्ली आहे.

२) ध्‍यान:

      या साधनेमध्ये ध्यानाची अगदी सोपी पद्धत आहे.

गुरु सियाग सिद्धयोग साधनेमध्ये समर्थ सद्गुरुदेव श्री रामलालजी सियाग यांच्या ‘दिव्य फोटोचे’ ध्यान केले जाते. ध्यान दिवसातून दोन वेळा सकाळी आणि सायंकाळी पंधरा- पधरा मिनिटे केले जाते. बाकी वेळेत जास्तीत- जास्त नामजप करायचा आहे.

ध्यान कसे करावे (ध्यानाची पद्धत):

१) आरामदायक स्थितीमध्ये बसा. आपण कोणत्याही स्थितीमध्ये बसू शकता. मांडी घालून फरशीवर, कुशनवर, योगा मॅटवर, कार्पेटवर बसू शकता.

२) गुरूदेवांचा फोटो साधारण दोन-तीन मिनिटे उघड्या डोळ्यांनी पहा. त्यानंतर डोळे बंद करा. आपल्या समस्येच्या निवारणासाठी तसेच ध्यान लागण्यासाठी गुरुदेवांकडे  समर्पण भावाने करूण प्रार्थना करा.

३) डोळे बंद असताना गुरूदेवांचा फोटो दोन भुवयांच्या मधोमध जेथे आपण टिळा वा टिकली लावतो, त्या ठिकाणी पहा.

४) गुरुदेवांनी दिलेल्या संजीवनी मंत्राचा निरंतर मानसिक जप होठ वा जीभ न हलवता सुरू ठेवा.

५) बहुतांश साधक  साधारणपणे पंधरा मिनिटानंतर आपोआप ध्यानातून बाहेर येतात. सुरुवातीला पंधरा मिनिटांचा अलार्म लावू शकता.

अशाप्रकारे या साधनेमध्ये निरंतर नामजप व नियमित ध्यान महत्वाचे आहे.

कोणा दुसऱ्या व्यक्तीसाठी ध्यान केले जाऊ शकते काय?

काही विशेष परिस्थितीमध्ये असं केलं जाऊ शकतं. जेव्हा संबंधित व्यक्ती काही विशेष कारणांमुळे ध्यान करू शकत नाही, तेव्हा दुसऱ्यासाठी ध्यान केले जाऊ शकते.

१) अगदी लहान मुलांसाठी त्यांचे आई-वडील ध्यान करू शकतात. पाच वर्षांपेक्षा मोठी मुले थोड्या-थोड्या वेळासाठी ध्यानाला बसू शकतात. पाच वर्षापेक्षा लहान मुलांसाठी त्यांचे आई-वडील ध्यान करू शकतात.

२) अपंग व्यक्ती वा मानसिक रोगी जे स्वतः ध्यान करू शकत नसतील, त्यांच्यासाठी त्या व्यक्तीच्या कुटुंबातील जवळची वा त्या व्यक्तीच्‍या समस्या निवारण्यासाठी आंतरिक तळमळ वाटणारी व्यक्ती त्या रोगी व्यक्तीचा बरोबर बसून व त्याच्यासाठी ध्यान करू शकते.

३) ज्या व्यक्ती कोमात आहेत वा ज्यांची मानसिक स्थिती ठीक नाही आहे वा जी व्यक्ती  औषध उपचार करूनही विचार करण्याच्या स्थितीमध्ये नसेल, अशा व्यक्तींसाठी सुद्धा ध्यान केले जाऊ शकते.

निरंतर मानसिक जप:

गुरुदेवांच्या दिव्य वाणी मध्ये आपण ऐकलं असेल की, दिव्य मंत्र ‘राऊंड दी क्‍लोक’ जपायचा आहे.

याचा अर्थ काय आहे?

24 तास जप करणे कसे शक्य आहे? याचा काय अर्थ आहे? जर तुम्ही 24 तास जप कराल तर झोपणार कधी? झोपताना कसा जप करायला?

या प्रश्नांचे उत्तर आहे की, आपण जेव्हा जागे असता तेव्हा आपले दैनंदिन काम करताना, जेवण करताना, ड्रायव्हिंग करताना, आंघोळ करताना, चालताना, व्यायाम करताना, कामावर जाताना, आराम करताना इत्यादी वेळी जितका जास्त वेळ शक्य असेल तितका जास्तीत- जास्त जप करायचा आहे.

जर आपण जागेपणी गंभीरता पूर्वक निरंतर मंत्र जप कराल तर काही दिवसात मंत्र आपोआप जपला जावु लागेल. म्हणजेच अजपा जप होऊ लागतो. गुरुदेव सांगतात की, जो मंत्र त्यांनी तुम्हाला दिला आहे त्याचा मानसिक करायचा आहे. निरंतर आणि गंभीरपणे जप केल्यानंतर आपल्याला जाणवेल की, पंधरा-वीस दिवसानंतर मंत्र आपोआप जपला जाऊ लागेल. एवढंच काय रात्री अचानक डोळे उघडल्यानंतर आपल्याला जाणवेल की, आपल्या आत मध्ये मंत्र चालू आहे. असं जाणवेल की, तुम्हाला मंत्रजप करायला लागत नाही आहे.  तसेच मंत्र जपाची जबाबदारी आतमध्ये स्थित कोणीतरी घेतली आहे.

काम करताना मंत्र जाप कसा कराल?

 बहुतांश साधकांची समस्या असते की, जेव्हा कामावर असतो तेव्हा मंत्र जप कसा करावा?

 कम्प्युटरवर काम करताना, प्रोजेक्ट लिहिताना, अकाउंटचे काम करताना, लोकांबरोबर बोलताना, मुलांना शिकवताना इत्यादी वेळी मंत्र जाप करण्याचे कसे लक्षात ठेवावे?

आठ तास कामाचे, झोपण्यासाठी आठ तास व त्यानंतर उरलेल्या आठ तासांमध्ये कशा प्रकारे मानसिक जाप प्रभावीपणे केला केला पाहिजे?  उरलेल्या आठ तासांमध्ये जेव्हा तुम्ही ना झोपलेले असताना ना काम करत असता तेव्हा न विसरता मंत्रजप निरंतर गंभीरता पूर्वक केला पाहिजे. अशाप्रकारे मंत्रजप जागेपणी मिळणाऱ्या मोकळ्या वेळेमध्ये केला जातो. त्यानंतर मंत्र आपोआप जपला जातो. गुरुदेव सियाग म्हणतात की, अशा प्रकारे मंत्र जप अजपा होऊन जातो. साधक जेव्हा गंभीरपणे प्रयत्न करतो तेव्हा मानसिक जप कोणत्याही प्रयत्नाविना आपोआप, अगदी काम करताना सुद्धा चालू राहतो. दिवसातून काम करताना पाच- सात वेळा जाणून घ्या की, मंत्र जपला जात आहे की नाही!  मग आपल्याला जाणवेल की, मंत्र आत मध्ये आपोआप जपला जात आहे.

गुरुदेव सांगतात की, मंत्र जप अजपा जपामध्ये परिवर्तन होण्यासाठी गंभीरता पूर्व निरंतर मानसिक जप करणे तसेच साधनेतील समर्पण भाव अत्यंत महत्त्वाचा असतो.

पूज्‍य सद्गुरूदेव सियाग जीवन परिचय:

पूज्य सद्गुरुदेव श्री रामलालजी सियाग प्रवृत्तिमार्गी संत आहेत. गुरूदेवांचे अवतरण (जन्म) राजस्थान मधील बिकानेरच्या पलाना या गावामध्ये 24 नोव्हेंबर 1926 ला झाले.

    गुरुदेव बिकानेर रेल्वेमध्ये हेड क्लर्कच्या पदावर कार्यरत होते. परिस्थितीजन्य कारणामुळे गुरुदेवांनी सन 1968 मध्ये गायत्रीची आराधना सुरू केली आणि 1 जानेवारी 1969 मध्ये गुरुदेवांना गायत्री सिद्धी (निर्गुण निराकार) झाली.

   स्वामी विवेकानंदांचे ग्रंथ वाचल्यानंतर गुरुदेवांनी जामसरमध्ये आराधना करणारे बाबा श्रीगंगाईनाथजी योगी यांना गुरु केले.

   बाबा श्री गंगाईनाथयोगी यांच्या परमकृपेने सन 1984 मध्ये गुरुदेवांना भगवान श्रीकृष्णाची (सगुण साकार) सिद्धी झाली.

  या दोन सिद्ध्या झाल्यामुळे गुरुदेवांमध्ये शक्तिपात दीक्ष॓द्वारा कुंडलिनी जागरण करण्याचे सामर्थ्य आले.

 बाबा श्री गंगाईनाथजी योगी यांच्या आदेशानुसार सन 1986 मध्ये गुरुदेवांनी रेल्वेमधून ऐच्‍छिक सेवानिवृत्ती घेतली.

तसेच विश्‍वकल्याणाच्या हेतूने सन 1990 पासून सार्वजनिक रूपामध्ये शक्तिपात दीक्षा देण्यास सुरुवात केली.

तेव्हापासून आजपर्यंत सिद्ध योगामध्ये वर्णित शक्तिपात दीक्ष॓द्वारा सद्गुरुदेवांनी हजारो-लाखो लोकांना चेतन केलेला आहे.

समर्थ सद्गुरु सियाग !!

गुरु केवळ शरीर नाही; गुरु हे चिरंतन परम तत्व आहे. गुरुदेवांच्या शक्तिपात मंत्राने तुम्‍ही चेतन होऊन जाता. तुमच्या आतला गुरु तुमच्या मनाला अधीन करतो, तुमची बुद्धी ज्ञानवान बनवतो, तुमचे मन शुद्ध आणि प्रकाशित होते.

हळूहळू तुमचा अहंकार नष्ट करून,  गुरुदेव तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाचा सहज अनुभव करून देतात.

गुरु- शिष्याचा संबंधच या जगामध्ये खरा संबंध आहे, इतर सर्व संबंध प्रकृतीने प्रदान केलेल्या व्यवहाराच्‍या निमित्‍ताने आहेत आणि गुरुदेव हे संबंधही योग्य रीतीने जोपासण्याचे शिकवतात.

कमळ जसे चिखलात राहूनही चिखलापासून वेगळे राहते, तसेच संसारात राहून, सर्व संसारीक कार्य करत गुरुदेव तुम्हाला निजधामामधे घेऊन जातात.

या जगामध्ये गुरु सारखा परम कल्याणकारी, परोपकारी कोणीही नाही.

ईश्वर हा प्रत्यक्ष अनुभूती आणि साक्षात्काराचा विषय आहे, कथा, प्रवचन ऐकणे वा ऐकविण्याचा नाही.

सिद्धयोगाचा अभ्यास केला जाऊ शकत नाही, तो आपोआप होतो.

सिद्धयोग म्हणजे सर्व प्रकारे परिपूर्ण योग की, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही.

सिद्धयोगाचा अभ्यास म्हणजे  नेहमी धैर्य,समभाव आणि आनंदाच्या राज्यांमध्ये राहणे.

समर्थ सद्गुरूदेव रामलालजी सियाग यांच्या चरणी कोटी-कोटी प्रणाम!!

आत्मसाक्षात्कार तसेच भयमुक्त, स्वस्थ, आनंदमय जीवनासाठी सिद्धयोग!!